पैशाच्या व्यवहारावरुन दोन मित्रांमध्ये जोरदार हाणामारी | कुसुर येथील घटना

93

वैभववाडी : पैशाच्या देवाणघेवाण वरुन दोन मित्रांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही घटना कुसुर टेंबवाडी येथे सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी वैभववाडी पोलीसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
कुसुर टेंबवाडी येथील दिंगबंर प्रकाश पांचाळ हे देवगड एस टी बसस्थानकात चालक म्हणुन नोकरीला आहेत. देवगड येथे नोकरीला असल्यामुळे देवगड श्रीकृष्णनगर येथील प्रमोद कृष्णा तेली यांच्याशी त्यांची ओळख झाली. दोघांचेही कौटुबिंक संबध जुळले. त्यांच्या कुटुंबातील सदस्याचे एकमेकाकडे जाणे येणे होते. प्रमोद आणि दिगबंर यांच्यामध्ये आंबा खरेदी विक्री आणि अन्य आर्थीक व्यवहार सुरू होते.

१७ एप्रिलला आर्थीक व्यवहारावरून प्रमोद, त्यांचा चुलता संतोष विश्राम तेली आणि दिगबंर यांच्यामध्ये कुसुर येथे जोरदार हाणामारी झाली. यासंदर्भात दिंगबंर पांचाळ यानी प्रमोद आणि संतोष यांच्याविरोधात  पोलीसांत तक्रार दिली आहे. प्रमोद तेली यांच्या पत्नीने ४० हजार रूपये आपल्याकडुन उसने घेतले होते. ते परत मागीतल्याच्या रागातुन त्या दोघांनी आपल्या घरी येवुन आपल्याला आणि आपल्या आई वडीलांना लाकडी दांड्याने मारहाण केली अशी तक्रार दिली आहे. तर प्रमोद याने दिंगंबर याच्याकडुन आपल्या पत्नीने कधीही पैसे घेतलेले नाहीत. आमच्यामध्ये आंबा खरेदी विक्री व्यवहारावरून आर्थीक व्यवहार होते. आपण घरी नसताना पत्नीकडे पैशाची मागणी करून तिच्याकडे दुचाकीच्या चावीवरून वाद घातला. त्याचा जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरी गेलेा असता दिंगबंरने आपल्याला लाकडी दांड्याने मारहाण केली अशी तक्रार त्याने दिली आहे. या प्रकरणी पोलीसांनी तिघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.