रेल्वेच्या विस्टाडोम कोचमधून लुटा कोकणच्या निसर्गाचा आनंद…!

मुंबई : मुंबई-कोकण दरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक चांगला व निसर्गासोबत होणार आहे. मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या प्रगती एक्स्प्रेसला अजून एक विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना आधिक आरामदायी अन् निसर्गाचा आनंद घेत प्रवास करता येणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी तेजस एक्स्प्रेसला आणखी एक कोच जोडण्याचा निर्णय जाहीर केला. १४ एप्रिलपासून तेजस एक्स्प्रेसला दोन विस्टाडोम कोच असणार आहेत.