एकीकडे ‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंग अद्यापही पोलिसांच्या हाती न लागल्याने पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे. असं असतानाच पंजाबमध्ये आज पहाटे गोळीबार झाला आहे. पंजाबच्या भटिंडा लष्करी तळावर आज, बुधवारी पहाटे ४.३५ वाजता गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून हे चौघेही ८० मीडियम रेजिमेंटचे होते अशी माहिती मिळतेय.




