वंचित बहुजनकडून १३ एप्रिलला बांद्यात भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन…!

बांदा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्गच्या वतीने गुरुवार दिनांक १३ एप्रिल बांदा येथे अभिवादन सभा व रात्री जयंतीच्या पूर्वसंध्येला जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ओवेक्स कॉम्प्लेक्स मैदान बांदा, सारा हॉटेल समोर हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी अनेक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची उपस्थिती असणार आहे.  कार्यक्रमाचे हे दुसरे वर्ष असून या जयंती उत्सवाच्या पूर्वसंधेच्या जल्लोषमय कार्यक्रमात जिल्ह्यातील तमाम धम्म बांधवांसह समाजातील सर्व बांधवानी उपस्थित राहून महामानवास अभिवादन करावे असं आवाहन जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांनी केलंय.