Crime News ; चौके येथील मारहाण प्रकरणातील आरोपींना १३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी | संशयित आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल

129

मालवण : चौके येथील कासार दीपक वामन येंडे यांना झालेल्या मारहाणीनंतर त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गणेश कृष्णा गावडे, अनाजी उर्फ बबरी कृष्णा गावडे दोघे रा. चौके मालवण व मारुती भिवा खांडेकर रा. कसाल यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी सहाय्यक सरकारी अभियोक्ता तुषार भणगे यांनी काम पाहिले.

चौके माळरानावर दीपक येंडे यांना मारहाण करण्यात आली होती. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. यातील तिन्ही संशयितांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस निरीक्षक विजय यादव तपास करत आहेत.