कलमठ वासीयांनी दिल्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा | श्री देव काशिकलेश्वरची प्रतिमा दिली विशेष भेट

108

कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांचा आज १० एप्रिल रोजी वाढदिवस..! वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर राणे प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कणकवलीतील कलमठ वासियांच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या. कलमठ ग्रामदेवता श्री देव काशिकलेश्वर ची प्रतिमा यावेळी कलमठ वासीयांनी भेट दिली.

यावेळी संदिप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, समाजिक कार्यकर्ते सुनील नाडकर्णी, माजी पं. स सदस्य महेश लाड, उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, दिनेश गोठनकर, पपु यादव, नितिन पवार, श्रेयस चिंदरकर, ऋत्विज राणें, मिलींद चिंदरकर, स्वरूप कोरगावकर, परेश कांबळी, प्रसाद कोरगावकर,
तेजस लोकरे, बबन गुरव उपस्थित होते.