सुभाष पंडित यांच्याकडून शाळेला संगणक भेट…! 

बांदा : जि. प. कास शाळा नंबर 1 या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून सध्या मुंबई इथं कार्यरत असलेले सुभाष पंडित यांनी शाळेची गरज ओळखून तीन संगणक संच आणि प्रिंटर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडून मिळवून दिले आहेत.
हे संगणक व प्रिंटर शाळेला नुकतेच प्रदान करण्यात आले, यावेळी कास सरपंच प्रवीण पंडित, उपसरपंच गजानन पंडित, काशिनाथ पंडित, रमेश पंडित, पांडुरंग पंडित, श्रीकांत पंडित. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका नाईक यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. सुभाष पंडित यांनी शाळेला संगणक मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानलेत.