मालवण : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या संकल्पनेनुसार व सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी यांच्या सूचनेवरून काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज सायंकाळी येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी, प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, महिला तालुकाध्यक्ष तथा वायरी ग्रामपंचायत सदस्य ममता तळगावकर, वायरी उपसरपंच प्राची माणगावकर, योगेश्वर कुर्ले, ॲड. अमृता मोंडकर, पराग माणगावकर, गणेश पाडगावकर व रुग्णालयामधील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.





