शिवप्रेमी सिंधुदुर्ग तर्फे राजमाता जिजाऊंना अभिवादन…!

कुडाळ : शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांच्या तर्फे आज राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आलीय. येथील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

आज गुरुवार दिनांक १२ जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती शिवप्रेमी सिंधुदुर्ग तर्फे सकाळी ९.३० वाजता पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने सायंकाळी ठीक ५.३० वाजता श्री भैरवदेव जोगेश्वरी यांच्या ढोलताशा पथक सोबत लहान मुलांची ऐतिहासिक वेशभूषेत मिरवणूक काढण्यात येणार आहे.

त्यानंतर राजमाता जिजाऊ चौकात लहान मुलांनी इतिहासात रमावे आणि ज्या पात्राची वेशभूषा केली त्यांचा इतिहास मोजक्या शब्दात सांगून इतर मुलांना पण प्रोत्साहन देण्यासाठी आगळा वेगळा कार्यक्रम योजिला आहे. या वेळी विवेक पंडित, सुविनय दामले, केशव म्हाडये, किरण कुडाळकर, घनश्याम परब, प्रशांत वायगणकर, गणेश कारेकर, विष्णू खोबर्डेकर, अनिकेत सावंत, महेश सावंत, गणेश कोळेकर, प्रथमेश सावंत, मयूर पिंगुळकर, मिलिंद देसाई आणि रमाकांत नाईक उपस्थित होते.