NPL मध्ये ‘विसोटी कृपा’ चा डंका | प्रसाद सातार्डेकरची बॅट तळपली 

सावंतवाडी : निगुडे प्रीमियर लीग अर्थात NPL क्रिकेट स्पर्धा यावर्षी मोठ्या उत्साहात पार पडली. NPL मध्ये  यंदा अनेक संघमालकांनी उत्साह दाखवत एकूण ८ संघांनी सहभाग घेतला होता. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विसोटी कृपा संघाने विजेतेपद पटकावले. तर डंकेल प्रस्ताव उपविजेता संघ ठरला.

विसोटी कृपा संघाचे संघमालक नंदू पोखरे आणि सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कर्णधार वैभव आरोसकर यांच्या नेतृत्वाखाली विसोटी कृपा संघाने सुरवातीपासूनच आपला दबदबा कायम ठेवला.

अष्टपैलू खेळाडू प्रसाद सातार्डेकर यानेही सुरवातीपासून चमकदार कामगिरी करत NPL मध्ये एक वेगळी छाप टाकली. मालिकावीर म्हणूनही प्रसाद सातार्डेकर याचीच निवड करण्यात आली.


या सामन्यांच्या बक्षीस वितरणावेळी निगुडे गावातील राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.