सिंधुदुर्ग : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात होत असलेल्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना व भाजपा युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे देखील या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत या निवडणुकीची कोकण विभागाची रणनीती ठरवत असताना निवडणुकीतील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून जबाबदाऱ्या देण्यात आल्या अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांनी दिली.
तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कामांंबाबतही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची जिल्हाप्रमुख संजय आंग्रे व पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, भास्कर राणे, कणकवली तालुकाप्रमुख भूषण परूळेकर, विधानसभा प्रमुख संदेश पटेल, महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, कुडाळ तालुका प्रमुख योगेश तुळसकर, पी टी पेडणेकर, मारुती सावंत आदी उपस्थित होते.





