मुंबई : आंबा नुकसानीबाबत मागणी करताना विचारपूर्वक मागणी करा की , जेणेकरून तुमची गरज पूर्ण होईल . यासाठी आवश्यक ती बैठक सात एप्रिल नंतर कधीही बोलवा . मी त्या ठिकाणी येईन . असे ठोस आश्वासन केंद्रीय सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी अंधेरी येथील सिंधुदुर्ग भवन येथे दिले . नारायण राणे येथे आयोजित शेतकरी आंबा महोत्सवाच्या उद्घाटनपर भाषणात बोलत होते .

सरकार नुकसान भरपाई देते हा पैसा शेवटी तुम्ही दिलेल्या कारातूनच गोळा झालेल्या पैशातूनच असतो . कुणीही आपल्या खिशातून नुकसान भरपाई देत नाही. त्यामुळे मी सदैव तुमच्या मदतीसाठी तयार आहे . असे ते पुढे म्हणाले .

शेतकरी आंबा महोत्सव उद्घाटन कार्यक्रमात नारायण राणे यांच्या सोबत नीलमताई राणे , माजी खासदार निलेश राणे , संयोजक संजय यादवराव आदी मान्यवर उपस्थित होते . मुंबईत अंधेरी येथील सिंधुदुर्ग भवन मध्ये 1 एप्रिल पासून शेतकरी आंबा बाजार सुरू झाला. खासदार निलेशराणे हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. संपूर्ण दोन महिने म्हणजे एक एप्रिल ते 31 मे कोकणातील शेतकऱ्यांच्या हापूस आंब्याची विक्री या शेतकरी आंबा बाजार मध्ये केली जाईल. आमदार प्रसाद लाड यांच्या पुढाकाराने संपूर्ण मुंबईत 15 ठिकाणी शेतकरी आंबा बाजार आयोजित करण्यात येत आहेत . यावेळी शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भेट घेतली व आणि आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. समृद्ध कोकण आंबा बागायतदार संघटनेचे प्रमुख प्रकाश साळवी आणि प्रदीप सावंत यांनी हे निवेदन दिले.

1.अरोरा टॉकीज ,महेश्वरी उद्यान माटुंगा
2. शामाप्रसाद मुखर्जी
उद्यान ,चंदावरकर लेन बोरीवली पश्चीम
3. सिंधुदुर्ग भवन , वर्सोवा अंधेरी
या तीन ठिकाणी शेतकरी आंबा बाजार पुढील दोन महिने चालू राहणार आहे. असदल कोकणातील विशेषतः देवगड आणि रत्नागिरी मधील हापूस आंबे मुंबईकरांना या शेतकरी आंबा बाजार मध्ये उपलब्ध होणार आहेत .





