पहिल्याच प्रयत्नात साईश लोंढेने सीए परीक्षा केली क्रॅक…!

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील कोनाळ येथील साईश लोंढे याने सीए परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळवले आहे. साईश हा तालुक्यात एलआयसीचे विमा सल्लागार अशोक लोंढे यांचे सुपुत्र आहेत. लोंढे यांच्या यशाबद्दल कोनाळ गावांसह तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

गेली कित्येक वर्ष एलआयसी मध्ये विमा प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या अशोक लोंढे यांनी त्यांच्या मुलाला उच्च शिक्षण देत सीए केल्याने त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे. कोनाळ गावात जन्मलेल्या साईशने सीए सारख्या कठीण परीक्षेत पहिल्याच प्रयत्नांत यश मिळविल्याने त्याचं हे यश दोडामार्ग तालुक्यातील युवा वर्गासाठी भविष्यकाळात एक मोठी प्रेरणा ठरणार आहे.

दोडामार्ग तालुक्यात प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर गोव्यात पुढील शिक्षण घेऊन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या नोव्हेंबर २०२२ मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये साईशने प्रथम श्रेणीत यश संपादन केल आहे.