उद्धव ठाकरे यांचं पक्षप्रमुख पद अबाधित राहणार…?

मुंबई : शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे राहणार का…? हा प्रश्न आता पडू लागला आहे कारण उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत ही 23 जानेवारीला संपत आहे. 23 जानेवारीला ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची पाच वर्ष पूर्ण आहेत त्यामुळे त्यांची पक्षप्रमुख पदाची मुदत संपते आहे . संघटनात्मक निवडणुकांसाठी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे. परंतु मधल्या काळातील शिवसेनेतील उलथापालथ पाहता त्याचे पडसाद आगामी पक्ष नेतेपद निवडीवर पडते का ते स्पष्ट होईल .

23 जानेवारी 2018 ला कार्यकारणीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख पदावर निवड झालेली होती. शिवसेनेचेच्या घटनेप्रमाणे ही निवड पाच वर्षांसाठी असते.त्यामुळे 23 जानेवारी 2023 ला पक्षप्रमुख पदाची मुदत संपते आहे. दुसरीकडे संघटनात्मक अधिकारासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघेही न्यायालयात गेले आहेत .या पार्श्वभूमीवर या संघटनात्मक निवडणुकांसाठी आयोगाची परवानगी मिळते का ? याकडे शिवसेनेचे लक्ष लागलेलं आहे.

या संदर्भात शिवसेनेची चिंता वाढली आहे . कालच निवडणूक आयोगामध्ये सुनावणी होती आणि त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने ही विनंती सुद्धा केली होती . मात्र निवडणूक आयोगाने यावर कोणतेही भाष्य केले नाही. आता एका आठवड्यानंतर पुन्हा सुनावली आहे. त्यावेळी या सगळ्या संदर्भात परवानगी मिळते का? यावर शिवसेनेचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा पक्षप्रमुख या पदाला चॅलेंज केले आहे . हा बदल गैर मार्गाने झाला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला होता. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेच राहतात की आणखी काही वेगळं घडते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.