Home महाराष्ट्र छत्रपती संभाजी नगरमध्ये तणावपूर्ण शांतता…!

छत्रपती संभाजी नगरमध्ये तणावपूर्ण शांतता…!

छत्रपती संभाजी नगर :  छत्रपती संभाजी नगर शहरातील किराडपुरा भागात चार ते पाच समाजकंटकांनी राम मंदिराच्या परिसरात दगडफेक केली असून या पार्श्वभूमीवर राममंदिर बाबत अफवा पसरवण्यात आल्याने या शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, परिसरात काही तरुणांकडून गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे.
मंदिरा बाहेर काही समाजकंटकांनी दगडफेक केली आणि काही वाहन ही जाळली परंतु मंदिराच्या आत मध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही असे सर्वांनी सांगितले. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान राडा झाला आहे. राम मंदिर परिसरात तयारी सुरू असतानाच अज्ञात तरुणांच्या गटाने जयंतीसाठी आलेल्या गटावर अचानक दगडफेक सुरू केली आणि हा राडा सुरू झाला.

सध्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून राखीव पोलीस दलाची पथके या ठिकाणी नेमण्यात आली आहेत . आता या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. केंद्रीय मंत्री भागवत कराड , राज्याचे मंत्री अतुल सावे , खासदार इम्तियाज जलील तसेच पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी नागरिकांना शांततेचा आवाहन केले आहे.