बांदा : कोकण रेल्वे मार्गावर पाडलोस-भाकरवाडी परिसरात अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना काल रात्री उशिरा उघडकीस आली. संबंधित युवक हा २५ ते ३० वर्ष वयोगटातील असून तो रेल्वेतून खाली कोसळल्याचा अंदाज आहे. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच बांदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. मात्र अद्याप त्याची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले नाही. सदर युवकाने आत्महत्या केली की त्याचा घातपात झाला याबाबतच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
Home Uncategorized खळबळजनक.! पाडलोस-भाकरवाडी परिसरात रेल्वे ट्रॅकवर आढळला अज्ञात युवकाचा मृतदेह | घातपाताची शक्यता...





