देवगड(प्रतिनिधी) : देवगड जामसंडे नगरपंचायतीचे गटनेते संतोष तारी यांना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय आंग्रे यांनी पत्र देऊन भाजपाच्या नगरसेवकांना विषय समिती पदासाठी मतदान करावे असे असा व्हीप काढावा यासाठी पत्र लिहून आदेश दिले आहेत.
शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्याने आता तो शिवसेनेचा पक्ष अधिकृत ठरला आहे. यामुळे सध्या भाजपा हा मित्र पक्ष असल्याने उद्धव ठाकरे समर्थकांची यामध्ये चांगलीच गोची झाली आहे.
संजय आंग्रे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की , आपण शिवसेना पक्षाच्या अधिकृत ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर देवगड- जामसंडे नगरपंचायत नगरसेवक म्हणून निवडून गेले आहात. आपण देवगड नगरपंचायत मध्ये शिवसेना पक्षाचे गटनेते आहात. शिवसेना पक्षाने दिलेल्या अधिकाराद्वारे मी आपणास खालील प्रमाणे व्हीप बजावण्यासाठी आदेश देत आहे.
‘सोमवार दि. २७/०३/२०२३ रोजी होणाऱ्या देवगड-जामसंडे नगरपंचायतच्या विषय
समिती सभापती पदाच्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे
१. सार्वजनिक बांधकाम समिती – सौ. प्रणाली मिलिंद माने
२. स्वच्छता वैधक, सार्वजनिक आरोग्य समिती सौ. आद्या अमेय गुमास्ते
३. पाणी पुरवठा व जल निसारण समिती- सौ. रुचाली दिनेश पाटकर,
वरील नमूद उमेदवारांना अधिकृतरित्या घोषित केलेले असून या उमेदवारांना संबधित विषय समिती सभापतीपदासाठी मतदान करावयाचे आहे असा व्हीप बजावण्यात यावा.





