देवगड : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपिड देवगड येथे स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र माझा या चॅनलचे उपसंपादक हेमंत मराठे यांनी भेट देत दिली. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाचा व महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांच्या देवींच्या केलेल्या स्थापनेचे दर्शन घेऊन मठांच्या ट्रस्टीचे विशेष गौरोद्गार काढले.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठाच्या दर्शनाला जायला कोकणातील सर्वच भाविकांना शक्य होत नाही पण कोकणातल्या भाविकांचं मन तुम्ही जाणला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच विशेषत: देवगड हडपिडमध्ये साडेतीन शक्तीपीठातील महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापुरची तुळजाभवानी माता, माहूर गडावरची रेणुका माता कोल्हापूरची महालक्ष्मी माता, वणीची सप्तशृंगी माता या तिन्ही देवींचे दर्शन एकाच घेण्याची संधी कोकणातल्या भक्तांना उपलब्ध करून कोकणातल्या भाविकांची मने तुम्ही यातून जिंकलात. याबाबत श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी संचलित श्री स्वामी समर्थ हडपिड मठाचे संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर व सर्व ट्रस्टींचे विशेष आभार व्यक्त केले. यावेळी मठाच्या वतीने हेमंत मराठे यांचा मठाचे अध्यक्ष प्रभाकर पेडणेकर व गाव समिती सचिव विनोद आईर यांनी सत्कार केला.





