कवडीमोल दराने काजू विकू नका | संघटितपणे काजुचे दर पाडले | लोकप्रतिनिधी ठरले कुचकामी : बबन साळगावकर

58

सावंतवाडी : कोकणातील प्रमुख उत्पन्न काजू. या काजूला हमीभाव शासनाने दिलाच पाहिजे. सध्याच्या काजू सीझनमध्ये शेतकऱ्यांचा काजू अत्यंत कवडीमोल दराने खरेदी केला जात आहे. कोकणच्या काजूची प्रत एक नंबरची आहे, तो चविष्ट असतो. हा काजू देशामध्ये चांगला काजू म्हणून ओळखला जातो. परंतु संघटितपणे काजू दर पाडून खरेदी केला जात आहे.

यावरती शासनाने लक्ष द्यावे उर्वरित महाराष्ट्रामधील तेथील लोकप्रतिनिधी सतर्क राहतात. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना हमीभाव प्रत्येक उत्पन्नाचा मिळत असतो. परंतु काजूचे दर मोठ्या प्प्ररमाणात कमी होत असूनही, हमीभाव मिळत नाही. इथल्या तिन्ही आमदारांनी खासदारांनी यात लक्ष घालावे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळून द्यावा नाहीतर असले लोकप्रति हवेतच कशाला.. तसं बघितलं तर इथल्या लोकप्रतिनिधी बागायतदार आंबा बागायतदार आणि काजू बागायतदार यांचा प्रश्न कधी सभागृहामध्ये लावून धरल्याचे दिसलेले नाही. तरी शासनाने दखल घेऊन हमीभाव द्यावा किंवा शासनाने काजू स्वतः खरेदी करावा असे आवाहन साळगावकर यांनी केलं.