नाशिक : लेखक, पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि IT व्यवसायीक राहुल बनसोडे यांचं आज दुपारी नाशिकमध्ये निधन झालं. प्राथमिक माहितीनुसार त्यांना ऑफिसच्या पायऱ्या चढत असताना त्यांना भोवळ आली आणि त्यांचा मृत्यू झाला. ते अंदाजे ४५ वर्षांचे होते. अनेक नियतकालिकांसाठी आणि दैनिकांसाठी त्यांनी विपुल लेखन केलं.





