मालवण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारंवार भेटणाऱ्या वैभव नाईकचा निष्ठा या शब्दाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे निष्ठेच्या वार्ता वैभव नाईक याने करू नये. असा जोरदार प्रहार भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्या सोबत कायम निष्ठावंत म्हणून राहणार. असे वक्तव्य आमदार वैभव नाईक यांनी एका कार्यक्रम निमित्ताने केले. यापूर्वीही त्यांनी असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार निलेश राणे यांनी घेतला. कुडाळ मालवण तिकीट फिक्स याची खात्री द्या, मी शिवसेनेत येतो. राणेंनाही सांगा. अशी मागणीही वैभव नाईक सातत्याने करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आपली कामे करून घेणे हेच वैभव नाईकचे काम आहे. आपले राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न वैभव नाईक करत आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी त्याचे काहीही देणेघेणे नाही. फक्त उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याच्या निष्ठेच्या बाता करायच्या. आपली आमदारकी कशी कायम राहील या गणितात वैभव नाईक आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी अथवा त्यांच्या पक्षाशी देणेघेणे नाही. खोटे बोलणे हेच वैभव नाईकचे काम आहे. अशी माणसे निष्ठेच्या बाता कश्या करतात. असा जोरदार हल्लाबोल निलेश राणे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे.





