असे आहे आजपासून सुरू होणार हिंदू नववर्ष…!

53

आज गुढीपाडवा , हिंदू नववर्ष चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी आहे. हिंदू नववर्षाची प्रतिपदेपासून होते. ज्याप्रमाणे इंग्रजी नववर्षाची सुरुवात ०१ जानेवारी २०२३ पासून सुरूवात झाली , त्याचप्रमाणे चैत्र महिन्याला हिंदू कॅलेंडरचा पहिला महिना म्हटले जाते. विक्रम संवत 2080 बुधवार, 22 मार्च 2023 रोजी सुरू झाले आहे. या संवत्सराचे नाव नल असेल आणि त्याचा अधिपती ग्रह बुध असेल आणि त्याचा मंत्री शुक्र असेल. या नवीन वर्षात असे अनेक प्रसंग येतील, ज्यात शुभ मुहूर्तावर व्यापारी आपल्या पुस्तकांची पूजा करू शकतील. नवीन वर्ष 2080 मध्ये असलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊया.

हिंदू नववर्ष उपासनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जेव्हा हिंदू नववर्ष सुरू होते, तेव्हा वसंत ऋतु देखील येतो. चैत्र महिन्याचा पहिला सण आणि हिंदू नववर्षाची सुरुवात माँ दुर्गेच्या स्वागताने होते. चैत्र नवरात्री चैत्र प्रतिपदेपासून साजरी केली जाते जी संपूर्ण ९ दिवस चालते.
नवीन वर्ष 2080 मध्ये 13 महिने अर्थात अधिक मास असणार आहे .
हिंदू कॅलेंडरनुसार, प्रत्येक वर्ष जरी 12 महिन्यांचे असले तरी यावेळी अधिक महिन्यांमुळे या नवीन वर्षात 13 महिने असतील. येथे महिन्यांची नावे आणि तारखा पुढीलप्रमाणे आहेत .

नवीन वर्ष 2080 महिन्याची तारीख

चैत्र महिना – 22 मार्च 2023 – 6 एप्रिल 2023

वैशाख महिना – 7 एप्रिल 2023 5 मे 2023

ज्येष्ठ महिना – 6 मे 2023 – 4 जून 2023

आषाढ महिना – 5 जून 2023 – 3 जुलै 2023

श्रावण महिना – 4 जुलै 2023 – 31 ऑगस्ट 2023

(यावेळी अधिक महिन्यांमुळे हा महिना 60 दिवसांचा असेल)

भाद्रपद महिना – 1 सप्टेंबर 2023 – 29 सप्टेंबर 2023

अश्विन महिना – 30 सप्टेंबर 2023 – 28 ऑक्टोबर 2023

कार्तिक महिना – 29 ऑक्टोबर – 2023 – 27 नोव्हेंबर 2023

मार्गशीर्ष महिना – 28 नोव्हेंबर 2023 – 26 डिसेंबर 2023

पौष महिना – 27 डिसेंबर 2023 –
25 जानेवारी 2024

माघ महिना – 26 जानेवारी 2024 – 24 फेब्रुवारी 2024

फाल्गुन महिना – 25 फेब्रुवारी 2024 – 25 मार्च 2024

हिंदू नववर्षाच्या दिवशी वेगवेगळ्या राज्यांमध्ये नवीन वर्ष साजरे केले जाते, तेही वेगवेगळ्या , नावांनी. त्याबद्दल जाणून घेऊया. सिंधी समाजातील लोक या दिवसाला चेटीचंद या नावाने संबोधतात. गुढीपाडवा महाराष्ट्रात मराठी नववर्ष म्हणून साजरा केला जातो. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये उगादी म्हणून ओळखले जाते. गोवा आणि केरळमधील कोकणी समाजातील लोक संवत्सरला पाडो नावाने संबोधतात. काश्मिरी नववर्ष म्हणून नवरेह म्हणून ओळखले जाते. आणि मणिपूरमध्ये तो साजिबू नोंगमा पनबाचा सण म्हणून साजरा केला जातो.