मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मुंबई जिल्ह्याची कुटुंब सहल व प्रेरणा मेळावा शांतीवन, नेरे,पनवेल येथे आत्ताच पार पडला. त्यात महा. अंनिस मुंबई जिल्हा कार्यकारिणी निवडली गेली. मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष- नंदना गजभिये, प्रधान सचिव- यश सूर्यवंशी, युवा विभाग कार्यवाह-रुपेश शोभा शंकर, महिला विभाग कार्यवाह- छाया धनवे, विविध उपक्रम विभाग कार्यवाह- शहाजी पाटोदेकर व अंनिप विभाग कार्यवाह- मंगेश घोडके यांची निवड करण्यात आली. या निवडीसाठी महा. अंनिस राज्य प्रधान सचिव नंदकिशोर तळाशीलकर, राज्य सरचिटणीस- विजय परब, राज्य सरचिटणीस- सचिन थिटे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. कुटुंब सहल व प्रेरणा मेळाव्याला मुंबईतील दादर, दहिसर, घाटकोपर, कुर्ला व बांद्रा शाखेतील कार्यकर्ते व त्यांचे कुटुंबीय असे 30 जण उपस्थित होते. अगदी उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.





