सावंतवाडी : रविवार दिनांक १९ मार्च २०२३ रोजी रामदास आठवले प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यस्तरीय समता परिषद पुरस्कार सोहळा श्री दत्त समर्थ हॉल शिवाजी पुल आंबेवाडी कोल्हापूर येथे सायंकाळी ०५ वाजता संपन्न झाला.विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना सन्मान प्रेरणा देण्याकरिता सदर पुरस्कार सोहळा संपन्न झाला. रामदास आठवले प्रतिष्ठान तर्फे आरोग्य आणि सामाजिक पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अमित वेंगुर्लेकर यांना श्री.अनिल माळवी सामाजिक न्याय विभाग, मा. ऍड,श्री,निरंजन तिवारी विधी तज्ञ मुंबई हायकोर्ट,श्री. पंकज इंगळे,मुख्य प्रबंधक बँक ऑफ बडोदा मा.स्वाती शाह वित्त विपणन विभाग, मा.स्मिता गिरी अध्यक्ष सामाजिक विभाग, मा.दीपक कचरे उद्यागपती यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
आयुष्यात अडचणी या येतच ,परंतु अशा वेळेस न डगमगता आपल्या सामाजिक कार्यातून अनेक गरजू लोकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर इतर अनेक जिल्ह्यांतील गरजूना मदतीचा हात देणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे .अमित वेंगुर्लेकर.अन्यायाविरोधात प्रत्येक लढाई यशस्वीपणे लढणारे आणि जिंकणारे एक आक्रमक व्यक्तिमत्व म्हणून समाजात त्यांची ओळख आहे.गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा, विमा योजना, गृह कर्ज योजना,रक्तदान शिबिर,विद्यार्थ्यांना शैक्षणिक,सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन,मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मदत कारणे अशा अनेक कामांमध्ये अमित वेंगुर्लेकर यांनी नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे.
समाजातील उद्भवणाऱ्या समस्या मार्गी लावण्यासाठी या युवकाने आपल्या सोबत सर्वोतोपरी सहकार्य करणाऱ्या युवकांची एक मजबूत फळी निर्माण केली.जिथे अन्याय दिसेल तिथे ठरलेल्या वेळी मदत कार्य ही सामाजिक कार्यकारिणी करत आहे.
इंटरनॅशनल प्राऊड ऑफ इंडिया आंतरराष्ट्रीय पुरस्कार शिवछत्रपती शिव सन्मान पुरस्कार अमरावती,राष्ट्रीय सहयाद्री लोकनायक पुरस्कार गोवा, राष्ट्रीय लोकमुद्रा कला सांस्कृतिक पुरस्कार पुणे,उत्कृष्ठ सामजिक कार्यकर्ता पुरस्कार सिंधुदुर्ग,दादा साहेब फाळके पुरस्कार मुंबई अशा अनेक पुरस्कारानी श्री.अमित वेंगुर्लेकर यांना आपल्या सामाजिक कार्याची दखल घेवून गौरविण्यात आले आहे.





