भटवाडीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…!

68

सावंतवाडी : भटवाडीत शिवजयंती उत्सव २०२३ तिथीनुसार शुक्रवारी १० मार्चला मोठ्या साजरा झाला. सालाबाद प्रमाणे तिथीनुसार शिवजयंती उत्सव तीस वर्षे थाटामाटात साजरा केला. पहाटे यशवंतगडावरून शिवप्रेमींनी मशाल घेऊन रॅली काढली. सकाळी नऊ वाजता शिवप्रेमींचे किल्ल्यावर आगमन झाले अकरा वाजता शिवमुर्ती पूजन झाले महिला व पुरुष यांची मनोरंजन स्पर्धा पार पडली.

विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी तसेच बक्षीस देण्यात आली. सायंकाळी सहा वाजता लहान मुलांचा डान्स, वेशभूषा महिलांचे नृत्य पार पडले. लहान मुलांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. रात्री नऊ वाजता पडद्यावर शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित सरसेनापती हंबीरराव सिनेमा दाखवण्यात आला. मातीचे गड, सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळी, किल्ल्यांना भेट देऊन स्वच्छता व साफसफाई केली गेली. आरोग्य शिबिराचे आयोजन केले गेले. तसेच एप्रिल मे महिन्यात आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करायचे आहे तरी या शिबिराचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन शेखर सुभेदार यांनी केलं.