सिंधुदुर्गात पडले धुके | आंबा, काजू बागायतदार धास्तावले

54

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमध्ये मागील जवळपास तीन महिने कोकणात थंडी मोठ्या प्रमाणात पडली. अगदी कालपर्यंत कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडी जाणवत होती. परंतु, आज सकाळी सिंधुदुर्ग जिल्हयात अनेक ठिकाणी धुके पडल्याचे दिसून आले. अचानक धुके पडून थंडी गायब झाली असली तरी यामुळे आंबा, काजू बागायतदार धास्तावला आहे. एकतर यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा पीक कमी असून केवळ मालवण, देवगड, वेंगुर्ले या तालुक्यात याचा काहीसा जोर आहे. तर काजू, जांभूळ यांना यावर्षी चांगला मोहोर आला आहे.
मात्र, आज सकाळी अचानक पडलेल्या धुक्यामुळे या पिकांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.