सिंधुदुर्ग : आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आता तिसऱ्या वेळी खासदार होण्यापासून त्यांना कोणीही रोखू शकत नाही. २०१३ साली विनायक राऊत यांना बाळासाहेबांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हयात काम करण्याचा आदेश दिला आणि पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे त्यांनी दोन्ही जिल्हे पिंजून काढले. त्यामुळे शिवसेना पुन्हा एकदा नव्याने रुजू लागली. शिवसेनेचे भगवे वादळ निर्माण झाले. १० वर्षाच्या खासदारकीच्या कारकिर्दीत अत्यंत अभ्यासू खासदार म्हणून त्यांनी काम केलेच. त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेचा नेता म्हणून राऊत साहेब उदयास आले. त्यांना उत्तम आरोग्य,उदंड आयुष्य लाभो अशा वाढदिवसा दिनी शुभेच्छा दिल्या.





