सावंतवाडी : न्हावेली ग्रामपंचायतच्या रेवटेवाडी ते भोमवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. न्हावेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रेवटेवाडी ते भोमवाडी हा रस्ता गेले कित्येक दिवस डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत होता.
या संदर्भात या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे म्हणून ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा व मागणी ही केली होती. त्यांच्या या प्रयत्नांनाने रस्त्याच्या डाबरीकरणासाठी त्याला आता यश आल्याने सदर चा रस्त्याचा आज भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली साहेब यांच्या व न्हावेली ग्रामस्थ यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवूनरस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी विद्यमान सरपंच अष्टविनायकधाऊसकर,भाजप मंडल अध्यक्ष महेश धुरी कंझूमर चेअरमन प्रमोद गावडे बाळू सावळ राजन कालवणकर, संतोष नाईक , हेमंत मराठे पत्रकार, प्रतिभा गावडे, तात्या चौकेकर, समीर पार्सेकर, नितीन पालयेकर ,केशव नाईक, शैलेश भगत, भाजपा शक्ती प्रमुख संजय दळवी, दादा परब ,भीवा नाईक, गितेश परब पत्रकार , सुनील धाउसकर ,आरती माळकर, निकीता परब, एकनाथ परब, भैय्या नाईक, न्हावेली गावाचे उपस्थित ग्रामस्थ भाजपचे कार्यकर्ते व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.





