बांदा : मडुरा बाबरवाडी येथील ओमकार नवयुवक मंडळ आयोजित बाबरवाडी प्रिमीअर लीग क्रिकेट स्पर्धेत बाबलपीर ब्लास्टर्स संघ विजेता ठरला. गौरेश वॉरियर्स संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेला क्रिकेट रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेचे उद्घाटन कोकण रेल्वे कर्मचारी तानाजी गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, प्रकाश वालावलकर, रमाकांत धुरी, पिंटो परब, संघमालक तानाजी धुरी, प्रवीण धुरी, शैलेश धुरी, प्रथमेश नाईक, दिगंबर धुरी, अमित धुरी उपस्थित होते.
अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. सुपर ओव्हरमध्ये बाबरपीर ब्लास्टर्स संघाने गौरेश वॉरियर्स संघावर थरारक विजय संपादन केला. तानाजी गावडे व मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना चषक व रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज दिवेश धुरी, फलंदाज प्रमोद धुरी, मालिकावीर ओंकार नाईक, उदयोन्मुख खेळाडू अनुप नाईक, उत्कृष्ट झेल भरत नाईक यांना वैयक्तिक पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी दोरी उडी या क्रीडा प्रकारामधे देश स्तरावर यश संपादन केलेल्या चिन्मय संजय धुरी याला समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच गोवा कला अकादमी आयोजित ५३ व्या मराठी ‘ब’ गट नाट्य स्पर्धेत दूर्वा थिएटर्सने सादर केलेल्या ‘द कॉन्शन्स ‘ या नाट्य प्रयोगात उत्कृष्ट पार्श्वसंगीत प्रथम क्रमांक प्राप्त योगेश धुरी यांना गौरविण्यात आले.
स्पर्धेत गणेश सातार्डेकर व प्रणव परब यांनी समालोचन केले. प्रविण परब व योगेश तळवणेकर यांनी पंच म्हणून काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष तुषार धुरी, उपाध्यक्ष प्रमोद धुरी, सचिव अमित धुरी, खजिनदार दिगंबर धुरी, रितेश पावसकर, सागर धुरी, स्वप्नील धुरी, निलेश कवठणकर, प्रसाद धुरी, अमित धुरी, संजय धुरी, भरत नाईक, परशुराम, आपा धुरी, अण्णा नाईक, किशोर धुरी, रामदास शेळके, लाडू धुरी, आशिष धुरी यांनी मेहनत घेतली.





