पळसंब येथे नळयोजनेच्या कामाचा शुभारंभ…!

कणकवली : जलजीवन मिशन कार्यक्रम योजने अंतर्गत ग्रामपंचायत पळसंब कार्यक्षेत्रात पळसंब वायंगणकरवाडी येथे नळयोजनेच्या कामाचा शुभारंभ पळसंब गावचे सरपंच श्री.महेश बापू वरक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. यावेळी उपसरपंच श्री.अविराज परब, ग्रामपंचायत सदस्य श्री.संतोष परब,सौ.राधिका कृष्णा तर्फे,सौ.रसिका साटम, माजी उपसरपंच श्री.सुहास सावंत,माजी सदस्य श्री.अरुण माने,ग्रामस्थ श्री.पिंट्या सावंत,श्री.विजय सावंत,श्रीधर सावंत,श्रीम.सूचिता सावंत,श्री.अशोक सावंत,प्रसाद सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.