निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त बीच मालवण इथं हॉलीबॉल स्पर्धा…!

मालवण : माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण भाजप युवा मोर्चा वतीने बीच डे नाईट हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन १५ मार्च रोजी चिवला बीच मालवण येथे करण्यात आले आहे. अशी माहिती भाजप युवा मोर्चा मालवण शहर उपाध्यक्ष सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी दिली आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघास 11,111/- तर उपविजेत्या संघास 5,555/- व अन्य पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेबाबत अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी अमू हर्डीकर 9423806184, जोंटी फर्नांडिस 9804921717, अक्षय मोर्जे 9767232397 यांच्याशी संपर्क साधावा.

असे आवाहन भाजप युवामोर्चा मालवण शहर अध्यक्ष ललित चव्हाण, वार्ड अध्यक्ष चेतक पराडकर, विशाल गोवेकर, फ्रान्सिस फर्नांडिस, महेश कांबळी यांनी केले आहे.