Home महाराष्ट्र मुंबईत आज राज ठाकरेंची जाहीर सभा…!

मुंबईत आज राज ठाकरेंची जाहीर सभा…!

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील राजकीय वातावरम तापू लागलं आहे. पालिका निवडणुकांच्या तारखा जरी अद्याप जाहीर झाल्या नसल्या, तरी सगळ्यांनाच आता या निवडणुकांचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून मुंबई महानगर पालिका निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे.

मुंबईतील अनेक समस्यांवर राजकीय पक्ष जोरकसपणे भूमिका मांडताना दिसत आहेत. मनसेकडूनही मुंबईतील समस्यांबाबत आवाज उठवला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मुंबईत जाहीर सभा होणार आहे. मनसे नेते संदीप देशपांडेंनी यासंदर्भात ट्विटरवर माहिती दिली आहे.