भर रस्त्यात गाडीने घेतला पेट…!

कुडाळ :  झाराप पत्रादेवी महामार्गावर चार चाकी गाडीला अचानक आग लागल्याने एकच तारांबळ उडाली. गाडीत एकूण चार जण प्रवास करत होते. सुदैवाने गाडीने पेट घेतल्यानंतर स्थानिक आणि धाव घेत लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि गाडीतील चारी जणांना सुखरूप बाहेर काढले.