कणकवलीत कारची धडक बसून जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू…!

कणकवली : तालुक्यातील हॉटेल गोकूळधाम समोर चालत जाणाऱ्या बिजलीनगर येथील कीर्ती सावंत यांना मागाहून येणाऱ्या करची जोरदार धडक बसली होती. त्या धडकतेत ती किर्ती सावंत या जबर जखमी झाल्या होत्या. अपघातक्षणी त्याना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र जबर जखमी होऊन त्यांच्या डोक्याला मोठा मार लागला होता. तसेच डोक्यातून मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव होत होता. रविवारी रात्री त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि रविवारी मध्य रात्री उपचारा दरम्यान निधन त्यांचे झाले.

सविस्तर वृत्त असे की, कणकवली बिजलीनगर येथील कीर्ती सावंत या तहसील कार्यालया समोरील सर्विस रस्त्यावरून रविवारी ७:४५ वा. च्या सुमारास चालत जाताना मागाहून भरधाव वेगाने येणाऱ्या कार चालकाने जोरात धडक दिल्याने अपघात झाला होता. या अपघातात कीर्ती सावंत या गंभीर जखमी झाल्या होत्या.

तर कीर्ती सावंत यांच्या सोबत असलेली त्यांची भाची हिला देखील कारची धडक बसली होती. सुदैवाने ती किरकोळ जखमी झाली. अपघातावेळी उपस्थित असलेले प्रदीप तळगावकर व दयानंद बांदेकर यांनी मदत करत रिक्षेतून जखमींना रुग्णालयात नेले. मात्र पण कीर्ती सावंत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. उपचारासाठी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी मध्यरात्री उशिरा किर्ती सावंत यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यांच्यासोबत असलेली त्यांची भाची सुखरूप आहे.