मुंबई : तीन दिवसांपूर्वीच हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. अशातच काल रात्री पुणे, मुंबई राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
तसेच गारपीठ झाल्याचंही बघायला मिळालं. काही ठिकाणी होळी दहनाचा कार्यक्रम सुरू असतानाच पाऊस आल्याने अनेकांची तारांबळ उडाली होती. दरम्यान, या गारपिटीने पिकांचं मोठं नुकसान झालं असून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.




