वेंगुर्लेच्या आर्यन आईरला राज्यस्तरीय कौशल्य पुरस्कार..!

बांदा : गौरी संगीत विद्यालय वडाळा आयोजित राज्यस्तरीय पखवाज तबला सोलो वादन स्पर्धेत वेंगुर्ला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मठ नं.2 मधील इयत्ता सहावीतील आर्यन काशिनाथ आईर याला विशेष कौशल्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

नुकतीच, गौरी संगीत विद्यालय वडाळा आयोजित ऑनलाईन पखवाज तबला सोलो वादन स्पर्धा घेण्यात आली. आर्यन आईर याच्या यशाबद्दल शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पाडलोस येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीधर परब तसेच जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.