नाफेड मार्फत १८,७४३ क्विंटल कांदा खरेदी करण्यात आली : देवेंद्र फडणवीस
मुंबई, विधानसभा : विदर्भातील आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने सुरू असलेल्या धान खरेदीची मुदत एकतीस मार्च पर्यंत वाढवली जाईल अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. वन पट्टे धारक शेतकऱ्यांची संख्या पस्तीस हजार इतकी आहे त्यापैकी सतरा हजार जणांची नोंदणी आँनलाईन पध्दतीने झाली आहे उर्वरित नोंदणी तातडीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती ही त्यांनी दिली.
मुंबईतील सोमय्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात मारहाण झाल्याप्रकरणी संबधित प्राध्यापक निलंबित करण्यात आला आहे, त्यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे त्यावर विद्यापीठाने पुढे काय कारवाई केली याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली, हा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता.
आजवर नाफेड मार्फत १८,७४३ क्विंटल कांदा खरेदी करण्यात आली आहे, ही खरेदी केंद्रे बाजार समितीत ही सुरू करण्याच्या सूचना दिल्या जातील अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली , छगन भुजबळ यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला होता, त्याला बाळासाहेब थोरात आणि सुनील केदार यांनी अनुमोदन दिलं होतं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नेमकी किती मदत द्यायची यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल लवकर घेऊन त्याबाबतची घोषणा केली जाईल असे ही फडणवीस यांनी सांगितले
आठ वर्षांपासून थकबाकी दार असणाऱ्यांचाच केवळ वीज पुरवठा खंडित केला जात आहे, शेतकऱ्यांची वीज तोडण्याचे आदेश अजिबात दिलेले नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली, शेतकऱ्यांची वीज खंडित केली जात आहे असा आरोप राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी विधानसभेत केली होती त्यावर फडणवीस यांनी ही ग्वाही दिली, हा केवळ राजकीय आरोप असल्याचं ते म्हणाले. यावर घोषणा देत विरोधकांनी सभात्याग केला.आता राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा सुरू आहे





