दोडामार्ग : महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षा आज दि. ३ मार्चपासून सुरू होत आहेत. मुलांना परीक्षा केंद्रावर येण्यासाठी अडचण होऊ नये यासाठी माटणे सोनावल हायस्कूलच्या मुलांची परीक्षा केंद्रापर्यंत येण्याची व्यवस्था करावी यासाठी एसटी फेरीची मागणी बोधे साहेब यांच्याकडे केली होती.
मागणीची दखल घेऊन दोडामार्ग ते माटणे सकाळी नऊ वाजता तर सोनावल हायस्कूल ते दोडामार्ग परीक्षा केंद्रापर्यंत सकाळी नऊ वाजता एसटी बसची फेरी असणार आहे. काही अडचण निर्माण झाल्यास आपणास संपर्क करावा असे आवाहन बाबुराव धुरी यांनी केले आहे. तसेच सहकार्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मा. बोधे यांचे आभार मानले आहेत.





