दोडामार्ग : उपोषणाचा इशारा दिला की कामे होतात याचा प्रत्येय विजघर मध्ये दिसून आला. दोडामार्ग ते विजघर मुख्य राज्यमार्गावरील तेरवण मेढे येथील पुल हे पुर्णपणे वाहतुकीस धोकादायक झाले असून या पुलावरून वाहनांची वर्दळ ही मोठ्या प्रमाणात होत असते. यापुर्वी ही बाब लक्षात आणून दिलेली होती परंतु त्या दुरुस्तीकडे आपण पुर्णपणे दुर्लक्ष करून त्या पुलाच्या बाजूने पर्यायी रस्ता काढण्यात आला होता. मात्र पावसाळा तोंडावर येत असल्याने तो रस्ता वाहून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सदरचे काम येत्या आठ दिवसात चालू न केल्यास ३ मार्च पासून पुलावर आम्ही शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुका प्रमुख संजय गवस यांच्या नेतृत्वाखाली युवासेना तालुका संघटक संदेश राणे व संदेश वरक उपोषणास बसणार आहोत असा इशारा दिला होता. तात्काळ यंत्रणा जागी होऊन कामालाही सुरुवात केली आहे. युवासेना तालुका संघटक संदेश राणे व संदेश वरक यांच्या प्रयत्नाना यश प्राप्त झाले असून सर्वत्र कौतुक होत आहे.





