वीज ग्राहक संघटनेने घेतली बाळासाहेब मोहिते यांची भेट | वीज दरवाढ पूर्णत: रद्द करण्याबाबत दिले निवेदन

106

कणकवली : महावितरण कंपनीने ३७ टक्‍के वीज दरवाढीची मागणी केली आहे. एवढी दरवाढ झाली तर सर्वसामान्य वीज ग्राहकांसह छोटे व्यापारी, उद्योजक, पर्यटन व्यावसायिक आर्थिक अडचणीत येणार आहेत. त्‍यामुळे वीजदरवाढ पूर्णत: रद्द करा अशी मागणी आज सिंधुदुर्ग जिल्‍हा वीज ग्राहक संघटनेने केली.

याबाबतचे निवेदन त्‍यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांना दिले. सिंधुदुग्र जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष काकडे यांच्यासह नितीन म्हापणकर, दिपक बेलवलकर, अशोक करंबेळकर, सुप्रिया पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी श्री.मोहिते यांनी भेट घेतली. यावेळी कोणतीही दरवाढ होता नये अशी एकमुखी मागणी केली. देशात फक्‍त महाराष्‍ट्रातच विजेचे दर सर्वाधिक आहेत.

त्‍यामुळे दर वाढ न करता इतर राज्‍यांच्याप्रमाणे वीज दर ठेवा अशीही मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली.