कणकवली : तालुक्यातील मुंबई – गोवा महामार्गावरील नांदगाव ओटव माईण ब्रिज गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ( एम. एच. ०७ ए. जी. ४७२५ ) लेन मधून देवगड ते सावंतवाडी दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनाला भिषण अपघात झाला.

सुदैवाने अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. तरी कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. सदर अपघात मंगळवारी पहाटे ५:३० वा. च्या सुमारास घडला.
प्रत्यक्षदर्शी अपघात पाहीला तर पुलावरून कोसळत दोन ते तीन वेळा पलटी होऊन नजिक असलेल्या विद्युत पोलवर आदळली. पहाटे अपघात झाला असल्याने मोठा आवाज झाला होता व पुढील दोन्ही चाके निखळून विद्यूत पोलला लटकत असल्याचे भयावह चित्र दिसत होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व अपघाताचा पंचनामा करण्यात आला.





