सावंतवाडी : बांदा येथे भाजप बांदा मंडळ कार्यकारिणीची जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
बांदा कट्टा येथील आनंदी मंगल कार्यालयात बांदा मंडल कार्यकारिणी ची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाध्यक्ष राजन तेली उपस्थित होते. यावेळी तेली यांचे जिल्हा भाजप उपजिल्हाध्यक्ष प्रमोद कामत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या बैठकीच्या सुरुवातीला कार्यकर्त्यांच्या कुटुंबियातील मृत व्यक्तींना श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच नवनिर्वाचित उपसरपंच, सदस्य यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी उपस्थित पदाधिकारी याना मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जोमाने कामाला लागा असा सल्ला तेली यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या योजना जनतेपर्यंत पोहोचावा असेही सांगितले. देश पातळीवर, राज्य पातळीवर, प्रदेश पातळीवर कशा प्रकारे पक्षाचे काम कसे चालते याबाबत तेली यांनी माहिती दिली.
यावेळी बांदा माजी सरपंच तथा राज्य परिषद सदस्य मंदार कल्याणकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, माजी जि प सदस्य श्वेता कोरगावकर, पंचायत समिती माजी उप सभापती शीतल राऊळ, शेखर गावकर, मधु देसाई तसेच बांदा मंडल तालुकाध्यक्ष महेश धुरी व मंडल पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.





