मुंबई : आप पक्षामध्ये प्रवेश करावा की कॉंग्रेस मधे यावर सुमारे एक वर्ष विचारविनिमय केल्यानंतर आजचे आघाडीचे तरुण कवी लेखक नाटककार दिग्दर्शक आणि पब्लिक इंटलेक्च्युल डॉ. अनिल सरमळकर यांनी विचाराअंती
न्यु रिपब्लिक इंडिया हे सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय विचारांचे संघटन स्थापन करण्याचा निर्णय दिनांक २२ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे विवीध क्षेत्रातील ज्येष्ठ विचारवंत यांच्याशी चर्चा करुन निश्चित करण्यात आला आहे.
दरम्यान गेले दोन वर्षांपासुन डॉ. अनिल सरमळकर यांनी आपल्या न्यू रिपब्लिक इंडिया या संघटनेची विविधांगी व्यापक वैचारीक भूमिकेची चर्चा घडवुन आणली आहे.
तळागाळातील तसेच समाजाच्या सर्व स्तरातील तरूण, तरुणी ज्येष्ठ जाणकार,विचारक कार्यकर्ते इत्यादींशी साधक बाधक चर्चा करण्यात आली असुन या नियोजित संघटनेचे ध्येय संकल्पना आणि मूल्ये आणि वैशिष्ट्ये आदींची चर्चा या संघटने संदर्भातील आपल्या लेखनातुन डॉ. अनिल सरमळकर यांनी केली आहे.
तथापि या संकल्पनेला समाजातील सर्व स्तरातील लोकांनी प्रतिसाद दिला आहे असे अनिल सरमळकर यांनी सांगितले व ते पुढे म्हणाले की ‘ भारतीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज समाज नक्कीच एका टप्प्यावर पोहचला आहे हे निश्चितच सकारात्मक आहे मात्र शोषित समाजांच्या समुहांच्या नेतृत्वाने प्रत्येक क्षेत्रात अपवाद वगळता समाजाने पाहिलेले सामाजिक राजकीय स्वातंत्र्याचे ध्येय गाठले नाही. समाज सर्व स्तरावर असहाय झाला असुन अपवाद वगळता संबंधित नेतृत्व खुजे, स्वार्थी,पारंपारिक आणि लाचार ठरले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी शहीदे – आझम भगतसिंग, पंडित जवाहरलाल नेहरू तसेच राजीव गांधी यांच्या संकल्पनेतील भारत निर्माण करायचा असेल तर आजचे हे सर्व क्षेत्रातील संकुचित विकृत कालबाह्य आणि विकले गेलेले नेतृत्व अस्ताला जायला हवे आणि नवे प्रजासत्ताकाचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी एक पाउल पुढे टाकायचे असेल खारीचा वाटा उचलायचा असेल तर राजकीय सामाजिक साहित्य आणि कला क्षेत्रात नव्या सर्जनशील आणि व्यापक दुरदृष्टी असलेले निस्वार्थी नेतृत्व निर्माण करावे लागेल त्यासाठी सामाजिक जिवनातील आणि राष्ट्रीय जिवनातील प्रत्येक क्षेत्रात नवे तेज असलेले तरूण आदर्श असे अनेक धेय्यवादी तरूण निर्माण व्हायला हवे आहेत आणि हे तरूण प्रजासत्ताक मानसिकतेच्या नव्या प्रयोगातून शक्य आहेत आणि त्या व्यापक कार्याचा एक प्रयत्न म्हणुन ‘ द न्यू रिपब्लिक इंडिया ‘ आम्ही स्थापना करीत आहोत असे या संघटनेचे संकल्पक, संस्थापक डॉ. अनिल सरमळकर यांनी स्पष्ट केले.
तथापि ‘ न्यू रिपब्लिक इंडिया ‘ ची स्थापना भारतीय समाजकारण, सांस्कृतिक,बौध्दिक क्षेत्रातील ज्येष्ठ विचारवंतांच्या उपस्थितीत ८ मार्च २०२३ रोजी महिला दिनाचे महान औचित्य साधुन नवी दिल्ली येथे होत आहे असेही डॉ. अनिल सरमळकर यांनी स्पष्ट केले आहे.





