खैराचे झाड तोडण्याच्या रागातून एकाला मारहाण…!

105

कुडाळ : खैराचे झाड तोडण्याच्या रागातून भडगाव बुद्रुक सिद्धार्थ नगर येथील ३० वर्षीय स्वप्निल बाबी कदम याला मारहाण केल्याप्रकरणी त्याचा चुलत भाऊ विनय कदम व सूर्यकांत कदम यांच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्नील कदम हे आपल्या घरी असताना भाऊ सिद्धार्थ हा आपले घराच्या लागून असलेल्या वहीवाटीत असणाऱ्या जागेतील खैराचे झाड तोडत होता. हे पाहून स्वप्नील यांचा चुलत भाऊ विनय लक्ष्मण कदम हा त्या ठिकाणी आला व भाऊ सिद्धार्थ याला शिवीगाळ करू लागला. हे खैराचे झाड आमच्या वहिवाटीत आहे असे म्हणू लागला. हे स्वप्निल कदम यांनी पाहून तेही त्या ठिकाणी आले. व विनयला याबाबत तू माझ्या भावाला शिवीगाळ का करतोस ?अशी विचारणा केली. यानंतर विनय हा स्वप्नील यांनाही शिविगाळ करू लागला. यावेळी विनयने आपले काका सूर्यकांत यांना हाक मारून बोलावून घेतले. त्यानीही पण या दोघांना शिवीगाळ करायला सुरुवात केली व सूर्यकांत यांनी त्या ठिकाणीच लाकडी जंगली दांडा घेऊन स्वप्नील यांच्या डाव्या बाजूला डोक्यावर म्हणून त्यांना दुखापत केली.

त्यानंतर स्वप्नील बेशुद्ध पडले. यानंतर ते शुद्धीवर आल्यावर त्यांना भावाने तक्रार देण्यासाठी कुडाळ पोलीस ठाण्यात आणले. यानंतर त्यांना कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्यावर या ठिकाणी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात चार दिवस उपचार केल्यानंतर बुधवारी कुडाळ पोलिस ठाण्यात येथे तक्रार दाखल केली आहे. शिविगाळ व माराहाण केल्या प्रकरणी स्वप्नील कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विनय कदम व सुर्यकांत कदम यांच्या वर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस राजेश कोळंबकर हे करत