हायमास्ट चोरीस गेल्याची ती अफवा | हायमास्ट नादुरूस्त झाल्यामुळे संबधित ठेकेदारांनी नेला

देवस्थान कमिटी मानकरी जयवंत घाडीगावकर यांनी केले उघड…

कणकवली : तालुक्यातील कळसुली गावातील भोगनाथ मंदीर येथील आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून बसविण्यात आलेला हायमास्ट चोरीस गेल्याची अफवा विरोधकांकडून केली जात आहे. मात्र सत्य घटना अशी की, श्री देव भोगनाथ मंदिरजवळील हायमास्ट नादुरूस्त झाल्यामुळे संबधित ठेकेदारांनी दुरुस्तीकरिता नेला आहे. आणि याच ठिकाणी सौऊर्जेवरील हायमास्ट येत्या काही दिवसांत बसविण्यात येणार आहे. आ. नितेश राणे व सरपंच यांची बदनामी केल्यास जसास तसे उत्तर देण्यात येईल, अशी प्रतिक्रीया देवस्थान कमिटी मानकरी जयवंत घाडीगावकर यांनी दिली आहे.

संबधित ठेकेदाराने याबाबतची पूर्व कल्पना मंदिर समितीतील विश्वस्त सुहास परब यांना दहा दिवसांपूर्वी दिली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळी हायमास्ट चोरीस गेला अशा अफवा होत असल्याचे सुहास परब यांनी सांगितले.