पिसोळ्यांमुळे बंद झाले घरातील विजेचे दिवे…!
सिंधुदुर्ग : मंगळवारी दि.२१ फेब्रुवारी सायंकाळी सूर्यास्तानंतर पिसोळी अर्थात उडणाऱ्या मुंग्या विजेच्या दिव्यांवर धावून आल्याचे चित्र पहावयास मिळाले. पिसोळ्यांचे थवेच्या थवे पथदीप आणि घरातील विजेच्या दिव्यावर घोंघावत होते. पिसोळ्यांच्या प्रादुर्भावामुळे लोक त्रस्त झाले होते. घरात पिसोळ्यांचा शिरकाव होऊ नये म्हणून किनारपट्टीवरील रहिवाशांनी आपले विजेचे दिवे बंद केले होते.
त्यामुळे बहुतांश घरांच्या दारात मंगळवारी काळोखाचे साम्राज्य होते. मंगळवारी वातावरणात उकाडाही नेहमीपेक्षा जास्त जाणवत होता. वारा दक्षिणेकडे जाण्याची चिन्हे दिसू लागल्यावर पिसोळी येतात असे मच्छीमारांनी सांगितले. दक्षिण वारा म्हणजे वादळसदृश हवामानाचे संकेत मानले जातात. पिसोळ्यांच्या आगमनानंतर वा-यांची दिशा आणि पाऊस पडणार का याकडे मच्छीमारांचे लक्ष लागून आहे





