दोडामार्ग : बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित सरस्वती विद्यामंदिर कुडासे ता. दोडामार्ग प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला.
याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका एस एस परब मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून अपयश आला तर खचू नका कोलमडू नका पुन्हा प्रयत्न करा यश नक्कीच तुमच्या पायाशी लोळण घेत येईल. तसेच स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःची किंमत कधीही कमी करून घेऊ नका. आपल्याला आवडेल त्या विषयात करियर करा मात्र जेथे जाल तेथे कष्ट करा. आपले व आपल्या आई-वडिलांचे तसेच शाळेचे नाव उज्वल करा असे प्रतिपादन केले.
ज्येष्ठ शिक्षक एस. व्ही. देसाई यांनी मोबाईल टीव्ही यासारख्या माध्यमापासून दूर राहण्यास तसेच चांगल्या मित्रांची संगत धरण्यास सांगितले दहावीनंतर असणाऱ्या विविध अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली त्याचप्रमाणे प्रत्येकालाच नोकरी मिळेल असे नाही शेतीसारखा व्यवसाय जरी करायचा असल्यास तो उत्तम प्रकारे करा असे सांगितले.
याप्रसंगी सर्व विद्यार्थानी ही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जे.बी.शेंडगे, ए.आर. तारी, एस. पी .गोंधळी, यु .बी वसावे, लवू बांदेकर, दीप्ती शेटकर हे शिक्षक उपस्थित होते.





