शिवरायांच्या जयघोषात किल्ले सिंधुदुर्गवर शिवरायांचे पूजन…!

मालवण : भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मालवणात आज “राणे स्टाईल” मध्ये प्रचंड उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. सकाळी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोरयाचा धोंडा येथे पूजन केल्यानंतर कुंभारमाठ ते बंदर जेटी पर्यंत माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भव्य मोटरसायकल रॅली काढून शिवरायांचा जयघोष करण्यात आला.

या रॅलीच्या निमित्ताने भाजपने मोठे शक्तीप्रदर्शन घडवून आणले. रॅलीत युवा वर्गा बरोबरच महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. या रॅलीनंतर बंदर जेटी ते सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरापर्यंत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.