कणकवलीत आज रंगणार इंडियन आयडॉलच्या कलाकारांचा ऑर्केस्ट्रा…!

145

कणकवली : शहरात आज इंडियन आयडॉलमधील कलाकारांचा ऑर्केस्ट्राकरिता कणकवली भाजपा कार्यालयासमोर ज्या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात कणकवली पर्यटन महोत्सव होतो त्या ठिकाणी हा इंडियन आयडॉल मधील कलाकारांचा आर्केस्ट्रा होणार आहे. इंडियन आयडॉलच्या कलाकारांचा धमाकेदार ऑर्केस्ट्रा उपजिल्हा रुग्णालयाच्या बरोबर समोर सायंकाळी ७ वाजता होणार असून, याकरिता भव्य व्यासपीठाची उभारणी करण्यात आली आहे.

कार्यक्रमपूर्वी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी एकंदरीत कार्यक्रम तसेच स्टेजबाबत चा आढावा घेतला. यावेळी मिलिंद मेस्त्री, राजू गवाणकर, बंडू गांगण, आबा माणगावकर, संतोष काकडे, संदीप राणे, मयूर धुमाळे आदी उपस्थित होते.

तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून आई चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण देखील या ठिकाणी केले जाणार आहे. दरम्यान सर्वानी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.