बांदा : बांदा शिवप्रेमी मंडळाच्या वतीने बांदा येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रथम शिवछत्रपती महाराजांच्या आश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थित शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
महिलांनी शिवाजीमहाराजांचा पाळणा देखावा, ढोल पथकाच्या गजरात हा शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. जय भवानी जय शिवाजी व ढोल ताश्याच्या गजरात मोठी रँली काढण्यात आली. यावेळी बांदा परिसरातील असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.





